फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

11 गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड रद्द

11 गुणवत्ताधारक  उमेदवारांची निवड रद्द

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर क संवर्गातील विविध प्रवर्गातून लिपिक पदावर निवड झालेल्या 11 उमेदवारांनी महापालिका प्रशासनाशी कोणातही संपर्क साधला नाही. महापालिका सामन्य प्रशासनाने संपर्क करूनही त्याला प्रतिसाद न दिल्याने या सर्व उमेदवारांची निवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने रद्द केली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

महापालिका आस्थापनेवरील लिपिक पदाकरिता नोकरभरती करण्यात आली. याकरिता घेतलेल्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने 20 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली होती. त्या निवड यादीमधील गुणत्ताधारक उमेदवारांना पुर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी व शारिरीक पात्रता तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र तीन उमेदवारांनी ही प्रमाणपत्र सादर केली नाहीत. तर एका उमेदवाराने शारिरीक पात्रता तपासणी प्रमाणपत्र सादर केले नाही. या उमेदवाराला मुतदवाढ देऊन संधी देऊनही त्याने वेळेत हे प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्याची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.

एका उमेदवाराची निवड होऊनही संबंधित उमेदवार मुदतवाढ देऊनही वेळेत रुजू झाला नाही. याशिवाय सहा गुणत्ताधारक उमेदवारांनी या पदावर रुजू होणार नसल्याचे पालिका प्रशासनाला लेखी कळविले आहे. याशिवाय पाच उमेदवारांनी प्रशासनाशी संपर्कच साधला नाही. विविध जाती प्रवर्गातील एकूण 11 गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलेली मुदतवाढ, अंति संधी याबाबातचा विचार करून या गुणवत्ताधारक उमेदवारांना पालिका आस्थापनेवरील लिपिक पदाच्या नोकरीची आवश्यक्ता नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या 11 उमेदवारांची निवड आयुक्त शेखर सिंह यांनी रद्द केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"