फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

महिला सुरक्षेसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन सुरू

महिला सुरक्षेसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन सुरू

मुंबई : राज्यात घडणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी महिलांसाठी समर्पित हेल्पलाइन सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

बदलापूर येथील शाळेत कंत्राटाने नेमलेल्या कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्यासह राज्यात इतर भागात देखील महिला व बालकांवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणांची माहिती सुलभपणे व तात्काळ पोलीस यंत्रणांमार्फत पोहोचण्यासाठी समर्पित हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

8976004111, 8850200600, 022-45161635 या क्रमांकावर महिलांनी मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"