फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
उद्योग महाराष्ट्र

हिंजवडीत मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतली 16 एकर जमीन

हिंजवडीत मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतली 16 एकर जमीन

हिंजवडी : सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने आयटी हब असलेल्या हिंजवडीत 16.4 एकर जमीन खरेदी केली आहे. 519.72 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यामुळे भविष्यात फ्ट कडून हिंजवडी मध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत.

मायक्रोसॉफ्टची भारतीय शाखा, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे 66 हजार 414.5 चौरस मीटर (16.4 एकर) जमीन खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यात ही खरेदी झाली असून या व्यवहारात इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपी कडून जमीन खरेदी केली गेली आहे.

सन 2022 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने पिंपरी चिंचवड शहरात 25 एकर भूखंड खरेदी केला. मायक्रोसॉफ्टकडून पिंपरी चिंचवड शहरात डेटा सेंटर सुरू केले जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. पिंपरी चिंचवड पाठोपाठ मायक्रोसॉफ्ट ने हैदराबाद मध्ये देखील 48 एकर जमीन खरेदी केली. पिंपरी चिंचवड शहरासह मुंबई आणि चेन्नई येथे देखील कंपनीकडून डेटा सेंटर तयार केले जातील.

मायक्रोसॉफ्टच्या बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या पाच शहरांमध्ये असलेल्या कार्यालयांमध्ये सुमारे 23 हजार कर्मचारी काम करतात. मायक्रोसॉफ्टने सन 2024 च्या सुरुवातीला एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये सन 2025 पर्यंत 20 लाख लोकांना एआय आणि डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज केले जाणार आहे. ‘स्किल्स फॉर जॉब्स’ या उपक्रमांतर्गत कंपनीकडून कौशल्याधारित मनुष्यबळ विकसित केले जाणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"