फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पिंपरीत आंदोलन

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पिंपरीत आंदोलन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : लाडकी बहीण नको,सुरक्षित बहीण पाहिजे.. अशा घोषणा देत बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (शनिवारी) पिंपरीतही भर पावसात काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी तोंडाला, डोक्याला काळ्या फिती बांधून निषेध केला. फेल गृहमंत्री असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते. भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, विनायक रणसुभे, मारुती कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, देवेंद्र तायडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळच्या महिला संघटिका शैला खंडागळे, अनिता तुतारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

या घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधकांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भर पावसात आंदोलन करण्यात आले. यावेळी एकीकडे सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला असताना शरद पवारांनी उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"