फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

दारूंब्रेमधील बिबट्याला पकडण्यास वन विभागाचा नकार

दारूंब्रेमधील बिबट्याला पकडण्यास वन विभागाचा नकार

पिंपरी, प्रतिनिधी : मावळ तालुक्यातील दारूंब्रे परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्याने मागील दोन दिवसात एका श्वानावर हल्ला केला आहे. तसेच गोठ्यातील कोंबड्या देखील फस्त केल्या आहेत. मात्र त्याने माणसाला कोणतीही इजा केली नसल्याने त्याला पिंजरा लावून पकडण्यास वन विभागाच्या नागपूर कार्यालयाने परवानगी नाकारली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दारूंब्रे परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. शेतात मशागतीची कामे सुरु आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री देखील शेतात जावे लागते. परिसरात बिबट्या आल्याने अनेकजण शेतात एकट्याने जाण्यास घाबरत आहेत. अचानक बिबट्याने हल्ला करण्याची भीती ग्रामस्थांना सतावत आहे.

दारूंब्रे येथील माजी सरपंच सोमनाथ वाघोले यांच्या घरासमोर बांधलेल्या श्वानावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये श्वानाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२९ जुलै) सकाळी उघडकीस आली. दरम्यान वाघोले यांच्या गोठ्यातील कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. वाघोले यांच्या कांद्याच्या वखारीत बिबट्या बराच वेळ बसून गेला.

ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याला पकडण्याची मागणी केली. त्यावर वन विभागाने अजब उत्तर दिले आहे. दारूंब्रे येथे आढळणाऱ्या बिबट्याने श्वान, कोंबड्या यावर हल्ला केला आहे. त्याने अद्याप कोणत्याही मनुष्याला धोका पोहोचवला नाही. त्यामुळे नागपूर कार्यालयाकडून बिबट्याला पकडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. बिबट्या भित्रा प्राणी आहे. तो निघून जाईल. ग्रामस्थांनी दारे लावून बसावे, असा सल्लादेखील वन विभागाने दिला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"