फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
देश विदेश

राजौरीमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान जखमी

राजौरीमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान जखमी

प्रतिनिधी, दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा दहशतवाही हल्ला झाला आहे. नुकताच शौर्यचक्र पुरस्कार मिळालेल्या परशोत्तम कुमार यांच्या घराजवळील लष्कराच्या सुरक्षा पोस्टवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला.

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील गुंडा खवास या गावातील लष्कराच्या सुरक्षा पोस्टवर हा हल्ला करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वीच इथे सुरक्षा पोस्ट स्थापन केली होती. तसेच या ठिकाणी काही जवान तैनात करण्यात आले होते. सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास या पोस्टवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. लष्करानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या गोळात लष्कराचा एक जवान जखमी झाला. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील काही भागात सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"