जनगणनेचे काम करताना शिक्षिकेसोबत गैरवर्तन महापालिका कर्मचारी निलंबित!

पिंपरी : जनगणनेचे काम करताना एका शिक्षिकेसोबत गैरवर्तन करणारा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीकडून चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

दिलीप भावसिंग आडे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. जनगणनेचे राष्ट्रीय काम करताना एका शिक्षिकेसोबत अनुरेखक दिलीप आडे याने गैरवर्तन केल्याची तक्रार निगडी पोलिसांकडे देण्यात आली होती. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता.
जनगणनेचे काम करताना आडे याने शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय गंभीर व गैरवर्तन केले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई निवारण अधिनियम 2013 मधील (तीन) च्या तरतुदीचा भंग केला. निवडणूक विभागाच्या अहवालात दिलीप यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे कळवले आहे. त्यामुळे आडे याचे सेवा निलंबन करण्याची कारवाई आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी केली आहे. मध्यवर्ती महिला तक्रार निवारण (विशाखा) समितीकडून चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागात दिले आहेत.

