मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघड; आरोपी अटक!

गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी
पिंपरी : मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट तीन ला गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की चिखली घरकुल परिसरामध्ये रेकॉर्डवरील आरोपी हा मोटरसायकल चोरी करून त्याची विल्हेवाट लावत आहे. गुन्हे शाखा युनिट तीन ने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने तीन गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जॉर्डन राजे साळवे (वय 20, रा. घरकुल, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे असलेल्या होंडा कंपनीची एक्टिवा मोपेड गाडी बाबत चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्तरे दिली. आरोपीस विश्वासात घेऊन विचारले असता सदरची गाडी चिखली पोलीस स्टेशन हद्दीत घरकुल येथून चोरी केल्याचे सांगितले. याशिवाय रुपीनगर येथून एक हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल नंबर (एम एच 14/ जी झेड/ 1237 तसेच दापोडी येथून एक स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून चिखली व दापोडी पोलीस स्टेशन कडील दाखल वेगवेगळे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या जप्त मोटरसायकलची किंमत 1 लाख 75 हजार रुपये आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट तीन चे संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलिस अंमलदार सोमनाथ बोराडे, स्वप्निल महाले, अजित रुपनवर ,तुषार वराडे, दिलीप राठोड यांनी केली.

