Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्याची धमकी देऊन पंधरा लाखाची फसवणूक!

ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्याची धमकी देऊन पंधरा लाखाची फसवणूक!

पिंपरी : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून न्यायालयाचे खोटे व बनावट पत्र तयार करून एका ज्येष्ठ नागरिकाला मनी लॉन्ड्री व राष्ट्रीय सुरक्षेची संबंधित गुन्हे दाखल असल्याचे सांगून अटक करण्याची धमकी दिली. 15 लाख रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. ही घटना दोन ऑगस्ट ते सहा ऑगस्ट 2026 पर्यंत सर्वे नंबर 63/3/17, गजानन नगर, रस्ता नंबर दोन, पिंपळे गुरव येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी विष्णू महादेव घारे (वय 71, रा. सर्वे नंबर 63,/ 3/ 17 गजानन नगर रस्ता ,नंबर दोन, पिंपळे गुरव )यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाईल धारक, कोटक महिंद्रा बँक खातेधारक इतर अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी फिर्यादीस पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सर्वोच्च न्यायालयाचे खोटे व बनावट पत्र तयार करून ते फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे तसेच फिर्यादी विरुद्ध मनी लॉन्ड्री व राष्ट्रीय सुरक्षेची संबंधित गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगून अटक करण्याची धमकी दिली. फिर्यादीची मालमत्ता व बँक खाते जप्त करण्याची भीती दाखविली. कोटक महिंद्रा बँक खाते क्रमांकाच्या चेक द्वारे 15 लाख रुपये भरण्यास भाग पाडून फिर्यादीची फसवणूक केली. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"