डी मार्ट मॉल मध्य़े 7403 रुपये किंमतीचे साहित्य चोरी; गुन्हा दाखल!

पिंपरी : चिंचवड येथील डी मार्ट मॉल मधील 7403 रुपये किंमतीचे साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आल्याने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार सहा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डी मार्ट येथे घडली.

याप्रकरणी रवी भिकाजी खंडाळकर (वय 43, रा. सिल्वर क्रिस्टल सोसायटी, 502 राहटणी लिंक रोड, बारणे कॉर्नर, थेरगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सचिन वसंत वाघमारे (वय 45 ), आयुष सचिन वाघमारे (वय 18, दोघे रा. साईनगर, गहुंजे, देहूरोड), यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे डी मार्ट मॉल चिंचवड येथे खरेदी करण्यासाठी आले असता त्यांनी त्यांचे खरेदी केलेल्या मालाच्या किंमतीपेक्षा 7403 रुपये किंमतीचे नऊ परफ्युम, दोन बूट जोड, सहा कपड्यांचे जोड, दोन अंडरवेअर व एक पेनचा सेट असा माल चोरी करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना सुरक्षा रक्षकाला मिळून आला. संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार हे पुढील तपास करत आहेत.

