Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

1st November 2026
गुन्हेगारी

घरगुती व व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस रिफील करणाऱ्या सात जणांना अटक!

घरगुती व व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस रिफील करणाऱ्या सात जणांना अटक!

पिंपरी : अवैधरित्या बिगर परवाना घरगुती व व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस रिफील करून विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगल्याने सात जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार सात ऑगस्ट रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास तळेगाव दाभाडे ते वराळे रस्त्यावर साईसृष्टी सोसायटीच्या शेजारी कुणाल भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन समोर ता. मावळ येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी अनंत देवेंद्र रावण पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार मदन बिकमसिंग ठाकूर (वय 35,) देवेंद्र हरिओम ठाकूर (वय 26 दोघे रा हॅपी सोसायटी ,ज्ञानेश्वर नगर, जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे),, सुनील प्रकाश इंगळे (वय 30, रा. योगेश्वरी अपार्टमेंट, ता. मावळ), सुनील मल्लिकार्जुन पुजारी (वय 28, रा. वराळे ता.मावळ), सुरज उमाकांत मसाळे (वय 22, रा. ग्रीन व्हील कॉलनी, महाळुंगे -बाणेर), रमेश व्यंकट रेड्डी (वय 39, रा. कल्पना सोसायटी, वराळे ,ता. मावळ), अशोक मेहराजराम कुमार ( रा. पूजा गार्डन शेजारी, वडगाव मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी एकूण 15 लाख 52 हजार दोनशे रुपये किंमतीचे गॅस सिलेंडर व एक मारुती सुझुकी कंपनीचा टेम्पो असा मुद्देमाल ज्वलनशील पदार्थ असल्याचे माहित असताना तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणारे लोकांच्या जीविकास धोका निर्माण होईल हे माहित असताना विनापरवाना घरगुती व व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस बेकायदेशीररित्या रिफील करून विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगला. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"