Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

नवलाख उंब्रे गॅस गळती प्रकरणी सात अधिकाऱ्यांवर गुन्हा!

नवलाख उंब्रे गॅस गळती प्रकरणी सात अधिकाऱ्यांवर गुन्हा!

पिंपरी : नवलाख उंब्रे येथील शापलर कंपनीत कार्बन डाय-ऑक्साइड गॅस गळतीच्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू आणि तिघेजण गंभीर जखमी झाल्या प्रकरणी कंपनीतील सात जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुर्घटना 9 जून रोजी घडली होती.

viara vcc
viara vcc

प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रामचंद्र जगदाळे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .सेफ्टी ऑफिसर सतीश सावळे, हीट ट्रीटमेंट हेड हेमंत बाळ, उषा फायबर सेफ्टी कंपनीचे संचालक एके पलानी, ब्रांच हेड अरुण प्रकाशम, फर्नोटेक इंजिनियरचे संचालक आयवन स्टायलिश, प्रोजेक्ट मॅनेजर अब्दुल रहमान अंतुले व इतर जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तळघरात आवश्यक परवानगी प्रशिक्षित मनुष्यबळ, सुरक्षा साहित्य, व्हेंटिलेशन व बचाव यंत्रणा नसताना फायर ऑपरेशन सिस्टीम मध्ये काम सुरू ठेवण्यात आले होते. निष्काळजीपणामुळे कार्बन डाय-ऑक्साइड गॅसच्या सिलेंडर बदलताना दुर्घटना घडून वैभव थोरात (वय 24), गौरीशंकर शर्मा (वय 38 )यांचा मृत्यू झाला. तर तिघे कामगार जखमी झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत. नवलाख उंब्रे गॅस गळती प्रकरणी सात अधिकाऱ्यांवर गुन्हा

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"