Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

पॅरोल रजेवरील आरोपी फरार ; गुन्हा दाखल!

पॅरोल रजेवरील आरोपी फरार ; गुन्हा दाखल!

पिंपरी : मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षा बंदी भोगत असलेल्या आरोपीला 21 दिवसाची पॅरोल रजा मिळाली मात्र पॅराल रजा संपल्यानंतर आरोपी पुन्हा कारागृहात हजर न झाल्याने चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही घटना चार मार्च 2026 पासून आज पर्यंत नाणेकरवाडी, ता. खेड येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी रामेश्वर गंगाराम पालवे (वय 51, कारागृह शिपाई, मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजी नगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. किरण विलास भोसले असे पॅरोलवर रजा घेऊन आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षा भोगत असून त्याने 19 जानेवारी 2026 रोजी 21 दिवसांच्या रजेसाठी कारागृह महानिरिक्षकाकडे अर्ज केला होता. त्यानुसार 12 फेब्रुवारी 2026 पासून त्याला रजेवर सोडण्यात आले होते. पॅराल काळात शिक्षा बंदी आरोपीने बाळू भैय्या भोसले (वय 35, नीलम हॉटेल समोर नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) येथे राहणेबाबत हमीपत्र व जामीन दिला होता. 21 दिवसांची रजा संपल्यानंतर 4 मार्च 2026 रोजी आरोपीने रजा संपवून कारागृहात हजर होणे आवश्यक असताना देखील आजपर्यंत आरोपी कारागृहात हजर न झाल्याने चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोते हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"