महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले!

पिंपरी : राहत्या बिल्डिंगच्या गेट जवळ मुलाची वाट बघत असताना पायी चालणाऱ्या अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. ही घटना शनिवार चार जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आदित्य कॉम्प्लेक्स, पिंपळे गुरव या सोसायटीच्या गेट जवळ घडली.

याप्रकरणी एका महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. निलेश गुलाब धोत्रे वय 22 रा. पी एम टी चौकाच्या पाठीमागे गव्हाणे वस्ती, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला राहत्या बिल्डिंगच्या गेट जवळ मुलाची वाट बघत थांबले असताना त्यांच्या बाजूने चालत आलेल्या अज्ञात व्यक्तीने फिर्यादी जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील एक लाख 80 हजार रुपये किंमतीचे बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. यामुळे फिर्यादीच्या गळ्याला जखम झाली. त्यांनी आरडाओरड करत त्याचा पाठलाग केला. परंतु काही अंतरावर आरोपी एक्टिवा दुचाकीवरून बसून पळून गेला. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ढगे तपास करीत आहेत.

