Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

आईला कामावरून काढल्याने टाटा कंपनीतील अधिकाऱ्यांना मारहाण!

आईला कामावरून काढल्याने टाटा कंपनीतील अधिकाऱ्यांना मारहाण!

चौघांना अटक
पिंपरी : आईला कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून कंपनीतील दोन अधिकार्याना बळजबरीने मोटरसायकलवर बसवून नेहरूनगर येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी खंडणी वजा धमकी देऊन चौघा जणांनी मारहाण केली. ही घटना शनिवार 27 जून सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनी कार प्लांट, मटेरियल गेट, पूर्णानगर, चिखली येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी विन्सेंट जोसेफ डिसील्वा (वय 57, रा. फ्लॅट नंबर 102, सर्वे नंबर 48, सहा/ एक/ दोन ,अवधूत आपारमेंट, गोकुळ नगर कोंढवा) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शांताराम तायप्पा शिंदे (रा. नेहरूनगर, पिंपरी), साहिल संदीप घाडगे (वय 22, रा. छोटी ज्ञानदीप शाळेजवळ, रुपीनगर तळवडे), कृष्णा अनंत काळे (वय 21, रा. श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर चिखली), पियुष मधुकर शेंडगे (वय 18, रा. शिवकृपा सोसायटी, मोरे वस्ती चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे कंपनीतील एचआर मसीन शेख, प्रोजेक्ट हेड राजेश नायर, सुपरवायझर स्वप्नील सूद असे कंपनी सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी रस्त्यावर उभे असताना तेथे आरोपी (कंपनीतील कामगार) व त्याचे सोबत आणखी तीन व्यक्ती हे दोन मोटरसायकल वरून आले. त्यांनी आरोपी यांच्या आईला कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून फिर्यादी व मोसीन शेख यांना जबरदस्तीने आरोपीने मोटर सायकलवर बसवून अपहरण करून आरोपीच्या घरी नेहरूनगर पिंपरी येथे नेले .

आरोपीने घरी नेल्यानंतर माझ्या आईला पुन्हा कामावर घे, तसेच माझा पगार वाढव अशी खंडणी वजा धमकी दिली. परंतु फिर्यादी यांनी त्यास टाटा कंपनीच्या नियमाप्रमाणे कामावरून कमी केले असल्याचे आरोपींना सांगितले. तसेच मॅनेजमेंट शी बोलून पगार वाढवण्याबाबत विचार करू असे फिर्यादी म्हणाले. फिर्यादीच्या या उत्तराने आरोपींना राग आला आणि त्यांनी फिर्यादी यांना मारहाण केली. चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोटे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"