Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

बहिणीशी भांडण करतो म्हणून दाजीवर चाकूने वार!

बहिणीशी भांडण करतो म्हणून दाजीवर चाकूने वार!

पिंपरी : बहिणीशी भांडण करतो म्हणून मेहुण्याने हातातील चाकूने उजव्या हाताच्या पंजावर व सीटवर वार करून दाजीला जखमी केले. ही घटना शनिवार 27 जून रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास चंद्रभागा हाइट्स, बिल्डिंगच्या टेरेसवर, नेरे ,ता. मुळशी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी रोहित तानाजी शेंडगे (वय 34, फ्लॅट नंबर 9, चंद्रभागा हाइट्स, नेरे ,ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विपुल संजय जानकर (वय 24, रा. सांगली) व त्याच्यासोबत असलेले अन्य तीन अनोळखी व्यक्ती (नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे एकटे झोपले असताना फिर्यादी त्यांचा मेहुणा विपुल संजय जानकर यांनी झोपेतून उठवून फिर्यादीला माझ्या बहिणीची भांडण करतो काय, तुला जिवंत सोडणार नाही असे बोलून हातातील चाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर व सीटवर वार केले. आरोपी बरोबर आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच चाकू ने फिर्यादीच्या दोन्ही पायावर वार करून प्लास्टिकच्या काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगनेकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"