फक्त मुद्द्याचं!

21st June 2026
गुन्हेगारी

ज्यादा परतावा देण्याच्या आमिषाने पाच कोटी रुपयांची फसवणूक!

ज्यादा परतावा देण्याच्या आमिषाने पाच कोटी रुपयांची फसवणूक!

पिंपरी : कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून शेअर मार्केट आणि भिशीमध्ये नागरिकांची पाच कोटी तीन लाख 14 हजार 386 फसवणूक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश पुंजा आहेरकर, छाया रमेश आहेरकर, वेदांत रमेश आहेरकर, आणि आदित्य रमेश आहेरकर यांनी वेदांत फायनान्स सर्विसेस, त्रिवेणी पूजा भांडार व आदित्य इंटरप्राईजेस या फॉर्मच्या माध्यमातून फिर्यादी हनुमंत भागवत जाधव व इतर गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आश्वासन दिले. आरोपींनी शेअर मार्केट तसेच विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतविण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करून मोठी रक्कम जमा केली. मात्र ठरलेला परतावा न देता आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथून या आरोपींना जेरबंद करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यादा नफ्याचे आमीष दाखवणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी संबंधित संस्थेची चौकशी व पडताळणी करण्यात यावी. फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर लगेच तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे देखील आवाहन केले आहे.

viara vcc
viara vcc

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. ही घटना निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी रमेश सोपानराव फाळके यमुनानगर निगडी यांनी फिर्याद दिली आहे .

कनका शर्मा नावाची महिला व इतर अज्ञात बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी व्हाट्सअॲप द्वारे संपर्क साधून गुंतवणुकी वर मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यानंतर विविध खात्यांमध्ये पैसे जमा करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"