फक्त मुद्द्याचं!

13th June 2026
पिंपरी-चिंचवड

15 व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द; 68 व्यक्तींना नाकारले शस्त्र परवाने!

15 व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द; 68 व्यक्तींना नाकारले शस्त्र परवाने!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे कठोर धोरण
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शस्त्र परवाना संबंधात नेहमीच कठोर धोरण अवलंबिले आहे . त्यांनी घेतलेल्या शस्त्र परवाना प्रकरणांच्या आढाव्यात पंधरा व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द केले असून एकूण 68 नवीन शस्त्र परवाना मागणी करणाऱ्या व्यक्तींना शस्त्र परवाने नाकारले आहेत.

viara vcc
viara vcc

शस्त्रांचा दुरुपयोग केल्याने व इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने पाच जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये मयूर काळूराम भोईर (वय 30, रा. हिंजवडी), सुभाष भिकाजी सपकाळ (वय 70, रा.नवी सांगवी), विजय नामदेव लांडे (वय 48, रा. भोसरी), साहिल राजेंद्र ढमाले (वय 32, रा. देहूगाव), शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय 41,आंबेठाण) यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांना वृद्धत्व आले किंवा मयत झाले असे एकूण आठ परवानाधारक यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले .तसेच शस्त्र परवाना मंजूर केलेल्या व्यक्ती ज्यांनी विहित मुदतीत शस्त्र खरेदी केले नाहीत अशा दोन शस्त्र परवानाधारक यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

नव्याने शस्त्र परवाना प्राप्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे प्राप्त अर्जांपैकी एकूण 68 व्यक्तींना शस्त्र परवाने नाकारले आहेत .नव्याने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींची प्राथमिक चौकशीमध्ये शस्त्र परवाने मंजूर करण्यासाठी कोणतेही सबळ कारण, आधार नसल्याचे चौकशीत आढळून आले. भविष्यात देखील शस्त्र परवाना संबंधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अशाच प्रकारे कडक धोरण राबवणार असल्याचे सांगण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"