फक्त मुद्द्याचं!

11th June 2026
गुन्हेगारी

कंटेनरच्या धडकेत दुचाकी वरील तरुणीचा मृत्यू!

कंटेनरच्या धडकेत दुचाकी वरील तरुणीचा मृत्यू!

पिंपरी : भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकी वरील एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवार 10 जून रोजी दुपारी सव्वा तीनशे सुमारास इंडियन ऑइल काजळे पेट्रोल पंप मोशी येथे घडली. सविता दयानंद कांबळे (वय 30) असे कंटेनर धडकेत मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी पांडुरंग एकनाथ कुचेकर (वय 35, रा. जयगड, बिल्डिंग नंबर बी. -15, फ्लॅट नंबर 205, सेक्टर 12, खंडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कंटेनर चालक सुंदर पंढरीनाथ गवळी (वय 26, रा. ममता चौक, दिघी ,मूळ- रा. मु. पो. मुदखेड, ता. धारूर, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या एक्टिवा दुचाकी क्रमांक (एम एच -14/ एफ बी -9112) वरून यांची बहीण सविता दयानंद कांबळे (वय 30, सदर हिला, इंडियन ऑइल काजळे पेट्रोल पंप, मोशी, आदर्श नगर) येथील घरी घेऊन जात असताना कंटेनर नंबर (एन एल- 01- ए डी /28 45 )वरील चालकाने निष्काळजीपणे व वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने कंटेनर चालवून फिर्यादीचे वडिलांचे दुचाकीला धडक दिल्याने फिर्यादीची बहीण सविता दयानंद कांबळे (वय 30) हिच्या मृत्यू कारणीभूत ठरला. फिर्यादीचे वडील या अपघातात जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पानसरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"