फक्त मुद्द्याचं!

11th June 2026
पिंपरी-चिंचवड

२२ हजार ९०६ मालमत्ताधारकांच्या शास्तीचे होणार समायोजन!

२२ हजार ९०६ मालमत्ताधारकांच्या शास्तीचे होणार समायोजन!

१६४ कोटीची टप्या-टप्याने होणार समायोजन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील २०२३ पूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर राज्य सरकारने माफ केल्यानंतर आतापर्यंत ९६ काेटी १२ लाख रूपयांचे समायाेजन केले आहे. २०२६-२७ या वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांच्या रक्कमेचेही मालमत्ता करामध्ये समायाेजन करण्यास बुधवारी (दि.१०) स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना २०१२-१३ पासून शास्तीकर वसूल केला जात हाेता. ३ मार्च २०२३ रोजी राज्य शासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ मार्च २०२३ पूर्वी झालेल्या २५ हजार ६७३ अनधिकृत बांधकामांना याचा लाभ मिळाला. या मालमत्ता धारकांनी शास्तीकराची २६० काेटी ५३ लाख रूपयांची रक्कम महापालिकेकडे जमा केली हाेती.

शास्ती कर माफीचा निर्णय झाल्यानंतर २०२३-२४ मध्ये २२ हजार ५१२ मालमत्ता धारकांना ३० काेटी ३ लाख, २०२४-२५ मध्ये २५ हजार ६७३ मालमत्ता धारकांना ३५ काेटी ९५ लाख, २०२५-२६ मध्ये २१ हजार ८२४ मालमत्ता धारकांना ३० काेटी १४ लाख असे ९६ काेटी १२ लाख रूपयांची रक्कम मालमत्ता करामध्ये समायाेजित केली. त्यानंतरही २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांची १६४ काेटी ४१ लाख रूपयांची रक्कम मालमत्ता करामध्ये समायाेजित करणे बाकी आहे. त्यानुसार २०२६-२७ या आर्थिक वर्षात १६४ काेटी ४१ लाखांपैकी जेवढी शक्य आहे, त्यानुसार ती रक्कम समायाेजित केली जाणार आहे. या समायाेजनाला स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

शहरातील २५ हजार ६७३ मालमत्ता धारकांनी प्रामाणिकपणे शास्तीकर भरून मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला हाेता. राज्य सरकारने २०२३ मध्ये शास्तीकर माफीचा निर्णय घेतला. त्यामुळे शास्तीकर भरलेल्या नागरिकांची रक्कम २०२३-२४ पासून त्यांच्या मालमत्ता करातून समायोजित केली जात आहे. आतापर्यंत २६० कोटी ५३ लाखापैकी ९६ कोटी १२ लाख रूपये समायोजन केले आहे. चालू आर्थिक वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांनी कर भरू नये. त्यांची आगाऊ भरलेली रक्कम मालमत्ता करात समायोजित केली जाणार आहे. – अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती. पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"