तडीपार आदेशाचे उल्लंघन; आरोपी अटकेत!

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिमंडळ दोन यांनी दोन वर्षाकरिता तडीपार केलेल्या आरोपीने आपल्या हद्दीत येऊन आदेशाचा भंग केल्याने तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार 9 जून रोजी सायंकाळी 8:15 सव्वा सहा च्या सुमारास टाटा वसाहत समोर, सोमाटणे गाव, तालुका मावळ येथे करण्यात आली.

याप्रकरणी प्रकाश तात्याराम जाधव पोलीस अंमलदार, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. मयूर सुहास मुर्हे (वय 30, सोमाटणे गावठाण, चौराई देवी मंदिराजवळ, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तडीपार आरोपी मयूर मुर्हे यास पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड हद्दीतून व रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका हद्दीमधून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तरी देखील तडीपार आदेशाचे उल्लंघन करून आरोपी हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत कोणतीही परवानगी न घेता व न्यायालयाची परवानगी न घेता मूळ गावी मिळून आला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे ओव्हाळ हे पुढील तपास करत आहेत.

