फक्त मुद्द्याचं!

26th May 2026
पिंपरी-चिंचवड

दुकानांसमोरील अतिक्रमण १५ दिवसात हटवा, अन्यथा कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

दुकानांसमोरील अतिक्रमण १५ दिवसात हटवा, अन्यथा कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पदपथावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असतात, त्यामुळे कोणत्याही पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांविरूद्ध महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई केली जाईल. तसेच काही दुकानदार आपल्या दुकानापुढे अतिक्रमण करून साहित्य ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने अशा दुकानधारकांनी येत्या १५ दिवसांत असे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे अन्यथा महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अतिक्रमण कारवाईच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, मनोज सेठिया, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उप आयुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सरगर, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पुजा दुधनाळे, मुकेश कोळप आदी उपस्थित होते.

महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना चालण्यासाठी विनाअडथळा पदपथ असावेत याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले असून शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त केले जात आहेत. ही मोहीम राबविताना पुन्हा त्याच जागी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयनिहाय हॉकर्ससाठी जागा निश्चित करून त्याठिकाणी हॉकर्स झोन तयार करावा. शहरात बकालपणा वाढणार नाही, तसेच हॉकर्समुळे रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयनिहाय फिरते पथक नेमून त्यावर सातत्याने देखरेख ठेवावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

काही दुकानदार जाणीवपुर्वक दुकानासमोरचे क्षेत्र वाढवून अनधिकृतपणे अतिक्रमण करतात. शिवाय दुकानासमोर साहित्य देखील ठेवतात, त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. अशा दुकानदारांनी येत्या १५ दिवसांमध्ये दुकानासमोरील अनधिकृत अतिक्रमण आणि साहित्य हटवावे अन्यथा संबंधित दुकानाचे अतिक्रमण निष्कासित करून दुकानदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"