फक्त मुद्द्याचं!

21st May 2026
पिंपरी-चिंचवड

प्रभाग क्र. ११ मधील जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई!

प्रभाग क्र. ११ मधील जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई!

फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ येथील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

viara vcc
viara vcc

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान उप आयुक्त अतुल पाटील, प्रशासन अधिकारी महादेव बोरे, बांधकाम परवानगी विभागाचे उप अभियंता किरण सगर व कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, तसेच उद्यान स्थापत्य व क्रीडा विभागाचे कनिष्ठ अभियंता वैभव विटकरे उपस्थित होते. याशिवाय बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) साक्षी जांभुळकर, निकिता भोईटे, विकास वारभुवन आणि रूपक शिनगारे यांनीही कारवाईत सक्रिय सहभाग नोंदविला.

सदर कारवाईसाठी फ, अ आणि क क्षेत्रीय कार्यालयांमधील एकूण ५७ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच १७ अतिक्रमण पोलीस, ६ जेसीबी मशीन, ८ मजूर आणि ३ वाहन चालक यांच्या सहाय्याने ही कारवाई प्रभावीपणे पार पाडण्यात आली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"