गोळीबार करणाऱ्या अरजु विष्णोई टोळीतील 3 शूटर्शना ठोकल्या बेड्या!

मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा मार्गे, उत्तराखंड असा पाठलाग
पिंपरी : पिंपरी चिंचवड मध्ये गोळीबार करणाऱ्या अरजु विष्णोई टोळीतील शूटर्शना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हरिद्वार मध्ये जाऊन ही मोठी कारवाई केली. या टोळीचा लॉरेन्स विष्णू टोळीशी थेट संबंध नसून त्यांचा नावकरीची ही टोळी आहे. या टोळीच्या शूटरचा शोध गुंडाविरोधी पथक घेत होते. प्रवीण राम निवास, पंकज राठी आणि सागर पाल अशी अटक केलेल्या तीन शूटरची नावे आहेत.

गुंडा विरोधी पथकाची हरिद्वारमध्ये कारवाई
गुंडा विरोधी पथक गेल्या पाच दिवसापासून मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा मार्गे, उत्तराखंड असा पाठलाग या टोळीचा केला आणि तिघांच्या मुस्क्या आवळल्या .या शूटरसनी पुनावळे येथील एजे फर्निचर मॉलवर शुक्रवार (15 मे) रोजी रात्री पाच ते सहा गोळ्या झाडल्या होत्या. एजे फर्निचर मॉलचे अशोक नैन यांच्याकडून दोन कोटीची खंडणी वसूल करण्यासाठी हा गोळीबार केल्याचे तपासात समोर आले आहे. अशोक नैन यांचा एमडी ड्रग्स आणि हवाला मध्ये हात आहे म्हणून गोळीबार केल्याचे विष्णोई टोळीने सोशल मीडियावर म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात अशोक नैन यांचा एमडी ड्रग्स आणि हवालाशी आतापर्यंत कोणताही संबंध आढळलेला नाही. विष्णई टोळीने एजे फर्निचर प्रमाणे वीर फर्निचरकडे पाच कोटीच्या खंडीची मागणी केली होती. लॉरेन्स विष्णोई आणि या टोळीचा थेट संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अरजु विष्णोई आणि कुलदीप कशिष या दोघांच्या टोळीचे हे तीन शूटर आहेत. कुलदीप कशिष हा गायक सिद्धू मुसेवालावर गोळीबार करणारा शूटर आहे. जो सध्या तुरुंगात आहे. अरजु विष्णोई आणि कुलदीप कशिष यांच्या टोळीने पिंपरी चिंचवड मधील हा गोळीबार घडवला.
प्रवीण राम निवास, पंकज राठी आणि सागर पाल अशी अटक केलेल्या तीन शूटरची नावे आहेत. या टोळीसाठी महाराष्ट्रातून शुभम लोणकर काम करतो .त्याचाही शोध सुरू आहे. पिंपरी चिंचवड मधील रावेत भागात असलेल्या एजे फर्निचर मॉलवर विष्णोई टोळीच्या तीन आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. या तीनही आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे. या प्रकरणात दोन पिस्तुलातून पाच ते सहा राउंड गोळ्या झाडल्या होत्या.

