फक्त मुद्द्याचं!

18th May 2026
गुन्हेगारी

घराचा कोयंडा तोडून 15 लाख 28 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालाची चोरी!

घराचा कोयंडा तोडून 15 लाख 28 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालाची चोरी!

पिंपरी : राहते घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील 178 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 75 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि एक लाख 45 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 15 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरून नेला. ही घटना शुक्रवार 15 मे रोजी पावणे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान बबाई बिल्डिंग, फ्लॅट नंबर 201, स्वामी समर्थ सोसायटी जवळ, रावेत, गावठाण येथे घडली.

या प्रकरणी मनोज अशोक भोंडवे (वय 25, रा. बाबाई बिल्डिंग, फ्लॅट नंबर 201, स्वामी समर्थ सोसायटी जवळ, रावेत, गावठाण) यांनी रावेत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या राहते घराचा कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील 178 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 75 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम 1 लाख 45000 असा एकूण 15 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दागिने व रोख रक्कम अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या इराद्याने चोरून नेला आहे. रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खिळे हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

भरधाव कार पलटी होऊन झाडावर आदळली;एकाचा मृत्यू!
पिंपरी : भरधाव वेगाने स्विफ्ट डिझायर कार चालविल्याने पलटी होऊन झाडावर आदळली. या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 14 मे रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुणे- नाशिक हायवे, भोसरी पोलीस स्टेशन जवळ, भोसरी येथे घडली.

याबाबत अभिषेक बाळासाहेब मुळीक (वय 25, रा. गंधर्व नगरी, वृंदावन कॉलनी, मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात आयुष विजय बनकर (वय 22, रा. बनकर वस्ती, मोशी) यांचा मृत्यू झाला आहे. फिर्यादी यांनी मयत आयुष विजय बनकर यांनी त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एम एच 14 / 0795) वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवीत असताना अचानकपणे कुत्रा गाडीच्या समोर आल्याने त्यांचा कार वरील ताबा सुटून सदरची कार ही पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात जाऊन आदळली. फिर्यादीचा लहान भाऊ आशिष बाळासाहेब मुळीक (वय 22 )यास गंभीर दुखापत झाली. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"