फक्त मुद्द्याचं!

12th April 2026
पिंपरी-चिंचवड

अतिक्रमण कारवाईची माहिती दिल्याने दोघांचे निलंबन!

अतिक्रमण कारवाईची माहिती दिल्याने दोघांचे निलंबन!

कनिष्ठ अभियंता संदीप हजारे,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शेषराव घनश्याम अटकोरे यांचे निलंबन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार होती. मात्र महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांनी संबंधित व्यक्तीला आदल्या दिवशी याची माहिती दिल्याने अतिक्रमण कारवाई मध्ये दबाव निर्माण झाला. याबाबत शिस्तभंग केल्याने दोन कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

viara vcc
viara vcc

प्रशासकीय गोपनीय कामकाजाचा भंग 
स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप हजारे असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कारवाईच्या कामकाजाकडे दुर्लक्ष केल्याने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शेषराव घनश्याम अटकोरे याचेही निलंबन करण्यात आली आहे. “ह” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एक एप्रिलला सांगवी ,नवी सांगवी, पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 32 मध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येणार होती. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाने सर्व तयारी व पोलीस बंदोबस्त ही मिळविला होता. मात्र कनिष्ठ अभियंता संदीप हजारे यांनी कारवाईची माहिती त्या भागातील अनधिकृत बांधकाम धारकांना दिली त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईच्या दिवशी अतिक्रमण कारवाईत दबाव निर्माण झाला. राजकीय नेते मंडळींचे क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकावर दबाव टाकला. त्यामुळे कारवाई स्थगित करण्यात आली. प्रशासकीय गोपनीय कामकाजाचा भंग केल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कनिष्ठ अभियंता हजारे याला तातडीने निलंबित केले आहे. तसेच त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले .

पिंपळे गुरव, वैदू वस्ती, सुदर्शन नगर, प्रभाग क्रमांक 29 मधील अनाधिकृत बांधकामे यांचे सर्वेक्षण करून त्याबाबत ड क्षेत्रीय कार्यालयास अहवाल सादर करणे, अनधिकृत बांधकामांना तात्काळ नोटीस देणे, त्यावर तात्काळ कारवाई करणे असे कामकाज स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शेषेराव अटकोरे यांच्यावर सोपविण्यात आले होते. वेळोवेळी अहवाल सादर केला नाही, नोटिसा बजावल्या नाहीत, वारंवार सूचना देऊनही कामात निष्काळजीपणा केल्याने आटकोरे यांचेही निलंबन करण्यात आले आहे. आयुक्तांनी त्यांची देखील विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"