फक्त मुद्द्याचं!

7th March 2026
गुन्हेगारी

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून रिफीलींग; एकास अटक

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून रिफीलींग; एकास अटक

पिंपरी : बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिफीलींगच्या साह्याने छोट्या सिलेंडर मध्ये गॅस काढून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला. ही घटना शुक्रवार सहा मार्च रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास चिखली नेवाळे वस्ती रोड, हरगुडे वस्ती, चिखली येथे घडली.

याप्रकरणी प्रवीण गंगाराम भोमाळे (वय 43, पोलीस हवालदार, चिखली पोलीस ठाणे )यांनी फिर्याद दाखल केली आहे. सत्यम शंकर भोसले (वय 20, रा नेवाळे वस्ती, चिखली, मुळगाव -करवंडी, ता. कराड ,जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सत्यम भोसले यांनी बेकायदेशीररित्या घरगुती वापराचे भरलेल्या गॅस सिलेंडर मधून छोट्या सिलेंडर मध्ये रिफिलिंग करत असताना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी घरगुती वापराचा मोठा गॅस सिलेंडर व लहान आठ गॅस सिलेंडर, गॅस रिफील भरण्याचे साहित्य, इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण 16 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवकुळे हे पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

बनावट हार्पिक विकणाऱ्या दोघांना अटक!
पिंपरी : हार्पिक या प्रसिद्ध कंपनीच्या नावाखाली बनावट उत्पादने विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या दोन जणांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई गुरुवार पाच मार्च दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील वाल्हेकरवाडी आणि स्वामी विवेकानंद सोसायटी परिसरात करण्यात आली.

याप्रकरणी धरमवीर अमरनाथ धल्लोड (वय 40, रा.मामुर्डी, देहूरोड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हिराराम गिरीधारीलाल चौधरी (वय 42, रा. चिंचवडे नगर, आणि विष्णूकुमार गंगाराम चौधरी (वय 33, रा. चिंचवड), गजेंद्र शेरसिंग जव्हेरी (वय 38, रा. संगमनेर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट मालाची खरेदी करून तो विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात ठेवला होता. छाप्यात पोलिसांनी एक लाख 34 हजार 420 रुपये किमतीचा हार्पिक कंपनीचा बनावट माल जप्त केला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"