फक्त मुद्द्याचं!

25th March 2026
पिंपरी-चिंचवड

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्रासाठी प्रयत्न : आमदार शंकर जगताप

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्रासाठी प्रयत्न : आमदार शंकर जगताप

महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर परिसर २ कोटी ५० लाख रुपयांच्या सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन
पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्टने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. सेवा कार्याला धार्मिक अनुष्ठानाची जोड देत समाजात एक आदर्श कायमच स्थापित ठेवला. आरोग्य, स्वच्छता, अनेक सामाजिक कार्यातून मानवतावादी दृष्टिकोन राखला. ज्यातून अनेक प्रकारचे मापदंड प्रस्थापित झाले. आगामी काळात हे आदर्शवत कार्य महाराष्ट्राच्या बाहेरही सर्वदूर पोहोचावे यासाठी देवस्थानला “ब” दर्जा पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

viara vcc
viara vcc

“क”दर्जा पर्यटन विशेष निधी
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा चिंचवड येथे मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी पार पडला. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका मनीषा चिंचवडे, आशा सूर्यवंशी, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र महाराज देव, विक्रम दौंडकर तसेच आजी माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले.हिंदू धर्मात पाच मुख्य संप्रदाय आहेत. सूर्योपासक, शैव, वैष्णव, गाणपत्य आणि शाक्त. यातील ‘गाणपत्य’ संप्रदाय हा गणपतीलाच मूळ परब्रह्म मानतो. या संप्रदायाच्या गौरवशाली इतिहासातील एक अग्रणी आणि देदीप्यमान ऋषी म्हणजे चिंचवडचे परमपूज्य श्री मोरया गोसावी. म्हणूनच चिंचवडचे मोरया गोसावींचे स्थान, महाराष्ट्रातील गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ म्हणून अत्यंत आदराने घेतले जाते. दरम्यान आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पवना नदीची आरती करून नदी स्वच्छतेची शपथ यावेळी घेण्यात आली.

जितेंद्र महाराज देव यावेळी म्हणाले, “मोरयाचा धर्म जागवण्या”चे काम आमदार शंकर जगताप यांच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्ट अधिक वेगाने करत आहे. २०२२ मध्ये या देवस्थानला “क” पर्यटन दर्जा प्राप्त झाला. मात्र त्यानंतर पाठपुरावा आणि निधी मिळवण्याचे काम आमदार जगताप यांच्या प्रयत्नांमुळे तडीस गेले.

या कामांसाठी २ कोटी ५० लाखांचा निधी
मंदिर परिसर व मंगलमुर्ती वाडा परिसर सुशोभीकरण करणे ( २५ लक्ष), पादुकामंदिर, सभा मंडप, संरक्षण भिंत उभारणे (५० लक्ष), मुख्य प्रवेशद्वार जतन संवर्धन व दर्जा वाढ करणे (२५ लक्ष), पेव्हिग ब्लॉक, दगडी टप्पा, स्टेनलेस स्टील रेलिंग, चुन्याची पॉइलिंग, सोलिंग, मुरूम फिटिंग( ५० लक्ष), अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधणे (१५ लक्ष), पाण्याची टाकी बांधणे (२५ लक्ष), अन्नदानासाठी छत्र बांधणे (२५ लक्ष), भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे (१० लक्ष),
मंदिर परिसरात सभोवतीच्या पटांगणामध्ये दगडी पायऱ्यांचे बांधकाम करणे (२५ लक्ष) या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी २ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"