फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
महाराष्ट्र

पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाचा मान श्रीमती सुनेत्रा पवार यांना!

पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाचा मान श्रीमती सुनेत्रा पवार यांना!

मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा
मुंबई : मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांचा आज भवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान श्रीमती सुमित्रा ताई पवार यांना मिळाला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याने त्यांचा शपथविधी झाला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

viara vcc
viara vcc

मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडला.या कार्यक्रमासाठी राज्यपाला आचार्य देवव्रत ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राज शिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. शपथविधी सोहळा संध्याकाळी पाच वाजता पार पडला. शपथविधी सोहळा अवघ्या दहा मिनिटात अत्यंत साधेपणाने पार पडला.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्र पवार तातडीने बारामतीला रवाना होणार आहेत. अजित पवार यांचा दहावा होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत. दुखवटा संपेपर्यंत त्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्या तरी या काळात कोणतेही हार , तुरा किंवा सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी (तेर जिल्हा धाराशिव ) या ठिकाणी झाला असून माजी मंत्री पद्मश्री पाटील यांची त्या भगिनी आहेत. 1985 मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्यासोबत झाला. लग्नानंतर काटेवाडी तालुका बारामती येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.

ग्राम स्वच्छता चळवळीची मुहूर्तमेड
काटेवाडी मध्ये ग्राम स्वच्छता चळवळीची मुहूर्तमेड त्यांनी रोवली .त्यांच्या प्रेरणेने ग्राम स्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आली. या कार्याची दखल घेत देश विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. या कामामुळे सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली. याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक, पर्यावरण पूरक, आरोग्य विषयक, महिलांच्या कर्करोगाविषयी जागृती निर्माण केली .2024 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश केला .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड
शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या पदावर अजित दादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यासाठी त्यांचे मन वळवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी पवार कुटुंबातीलच व्यक्ती पाहिजे असे त्यांचे मत आले.

ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्राताई पवार यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला,ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रस्तावास अनुमोदन दिले, आणि प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्राताई पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार याबाबत आपल्याला माहिती नाह, आणि त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्या पक्षाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे प्रमुख आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यावर काही भाष्य करणार नाही असे पवार म्हणाले. परिवार हा साथ देण्यासाठी असतो बाकी राजकारण वेगळं आहे असे त्यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"