फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
पिंपरी-चिंचवड

मकर संक्रांतीच्या सणाला वस्तूंचे, पैशाचे वाटप करणे हा आचारसंहितेचा भंग!

मकर संक्रांतीच्या सणाला वस्तूंचे, पैशाचे वाटप करणे हा आचारसंहितेचा भंग!

पिंपरी:- निवडणूक आचारसंहितेमध्ये येणाऱ्या सार्वजनिक सणामधील आचरणाबाबत मा. राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे विहित केलेली आहेत. राजकीय पक्षाचे नेते उमेदवार ,कार्यकर्ते ,सण , ,उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये व्यक्तीगतरित्या सहभागी होऊ शकतात. तथापि या सण उत्सवाच्या निमित्ताने कोणत्याही राजकीय नेत्यांनी अथवा उमेदवाराने कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये अथवा त्यासाठी कुठल्याही सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊ नये. तसेच नागरिकांनी देखील या प्रलोभनाला बळी पडू नये. असे आवाहन सुरेखा माने उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्ष प्रमुख यांनी केले आहे.

viara vcc
viara vcc

निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये भोजनावळी , जेवणाचे कार्यक्रमाचे आयोजन करू नये. दिनांक १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण येत असल्याने महिलांना वाण देण्याच्या उद्देशाने राजकिय पक्ष, उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी वस्तूंचे, पैशाचे वाटप करू नये. मते मागण्यासाठी लाच देणे व लाच घेणे हा भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १७० नुसार गुन्हा असून यासाठी एक वर्षाच्या कालावधीपर्यंत शिक्षा होऊ शकते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरांमध्ये एकूण ३४ भरारी पथके व ३४ एसएसटी पथके कार्यरत असून या सर्वांची अशा घटनांवर २४ तास नजर राहणार आहे,अशी कोणतीही घटना होत असलेचे निदर्शनास आल्यास तात्काळ महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयास व संबंधित क्षेत्रीय कार्यालयात स्थापन केलेल्या आचारसंहिता कक्षास संपर्क करावा, असे आवाहन सुरेखा माने यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"