सामाजिक कार्य करणाऱ्या दोन महिलांनी एका महिलेची केली फसवणूक!

पिंपरी : कंपनीत दिलेल्या मानसिक त्रासाबाबत न्याय मिळवून देतो असे सांगून सामाजिक कार्यकर्त्यानी सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक केल्याची आणि तक्रार मागे घेण्यासाठी दोन दिवस डांबून ठेवल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात एका महिलेने केली आहे. सप्टेंबर 2024 ते 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत रा. स्वामी समर्थ कॉलनी, तुळजाई हॉस्पिटल मागे चाकण, ता. खेड येथे ही घटना घडली आहे,

एका 38 वर्षीय महिलेने रा. ता. खेड यांनी दोन सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरोपी एक व दोन यांनी कंपनी एच आर हेड यांनी फिर्यादी ला कंपनीत दिलेल्या मानसिक त्रासाबाबत न्याय मिळवून देतो असे सांगून महिला आरोपी एक व दोन यांनी फिर्यादी कडून एच. आर. हेड विरोधात तक्रार अर्ज घेतला आणि हे काम करण्यासाठी पैसे लागतात असे सांगून सप्टेंबर 2024 ते माहे सप्टेंबर 2025 दरम्यान वेळोवेळी 70 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. आरोपी एक व दोन यांनी संगणमत करून कंपनी एच आर हेड यांचे कडून देखील पैसे घेऊन फिर्यादीस एच आर हेड यांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला.
फिर्यादी महिलेला 19 सप्टेंबर ते 21सप्टेंबर असे दोन दिवस आरोपी क्रमांक एक हिच्या घरी डांबून ठेवले. तसेच पुन्हा फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी करून कंपनी एच आर हेड यांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेणे बाबत सांगून पैसे न दिल्यास कोठेतरी नेऊन टाकून देऊ अशी धमकी दिली .जीवाच्या आकांताने फिर्यादी व फिर्यादीचे पती यांनी भीतीपोटी आरोपींना दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी 30 -30 हजार रुपये दिले. याबाबत गुन्हा दाखल असून चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.

