फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
गुन्हेगारी

सुरज पवार, सुनिल ठाकुर, नितीन शिंदे तीन टोळयांना मोक्का!

सुरज पवार, सुनिल ठाकुर, नितीन शिंदे तीन टोळयांना मोक्का!

पिंपरी- चिंचवड पोलीसांची संघटीत गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी कारवाई
पिंपरी: संघटित गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलीसांनी कारवाई सुरु केली आहे. शहर, चाकण, पौड परिसरातील कुख्यात सुरज पवार, सुनिल ठाकुर, नितीन शिंदे या टोळयांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी- चिंचवडचे आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष दिले आहे. खंडणी मागणे, बलात्कार करणे, विनयभंग करणे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर दिला आहे. आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कारवाईचे निर्देश दिले होते. आजपर्यंत ३१ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १६० आरोपीवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तसेच सप्टेंबर २०२५ मध्ये ३ गुन्हयांतील एकुण २१ गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

सुरज पवार टोळीवर सात गुन्हे
टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर ७ गंभीर गुन्हे आहे, त्यामुळे बावधन पोलिसांनी टोळी प्रमुख सुरज ऊर्फ सोन्या राजू पवार (रा. लवळे फाटा, पिरंगुट) , ऋषीकेश देविदास कांबळे (वय २१ वर्षे, रा. सहकानगर, पिरंगुट), कृष्णा ऊर्फ पिल्या निवृत्ती कांबळे (वय १९ वर्षे, रा. बालाजीनगर), प्रज्वल चिदानंद मुदळ (वय १९ वर्षे, रा. बालाजीनगर, लवळे फाटा, ता. मुळशी), युसुफ समीर शेख (वय २४ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, पिरंगुट), अभिषेक ऊर्फ क्रिश तिरुपती वायकर (वय १९ वर्षे, रा. शेलारवाडी, उरवडे), कालीचरण मानसिंग ठाकूर, (वय २६ वर्षे, रा. पिरंगुट), विजय ऊर्फ गोट्याभाई मानसिंग ठाकूर ( वय २४ वर्षे, रा. पिरंगुट), साहील महोदव सांगळे (वय २४ वर्षे, रा. पिरंगुट), ओंकार बाळू भारती (रा. लवळे फाटा, पिरंगुट), कुलदीप पंडीत कांबळे ( रा. लवळे फाटा), जय योगेश निकटे (रा. निकटे वस्ती, पिरंगुट) या टोळीस मोक्का लावला आहे.

काळेवाडीतील सुनील ठाकूर टोळीवर सात गुन्हे
काळेवाडी परिसरातील ठाकूर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ९ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळुन आली आहे. त्यामुळे काळेवाडी पोलिसांनी सुनिल विश्वनाथ ठाकूर, ऊर्फ सुनिल शेट्टी (वय २५ वर्षे, रा. जय मल्हार नगर थेरगाव), सुरज ऊर्फ पिल्या भालचंद्र शिंदे (वय १८ वर्ष, रा. सोमद्वार कॉलनी, रहाटणी), कृष्णा ऊर्फ चंग्या शामराव धाईजे ( वय १८ वर्षे, रा. अमरदीप कॉलनी, छत्रपती चौकाजवळ, रहाटणी), शिवराज ऊर्फ शिवऱ्या ज्ञानदेव चव्हाण (वय २५ वर्षे, रा. नखाते वस्ती) यांच्यावर कारवाई केली आहे.

चाकण परिसरात नितीन शिंदे टोळीवर ६ गुन्हे
चाकण, भोसरी परिसरातील नितीन शिंदे टोळीवर ६ गंभीर  गुन्हे केल्याची नोंद आहे, त्यामुळे महाळुंगे एमआयडी पोलीसानी  नितीन मधुकर शिंदे (वय २७ वर्ष, रा. अर्थन सोसायटी, नाणेकरवाडी),  वैभव गिताराम माने (वय २३ वर्षे, रा. हनुमान मंदीराजवळ, खराबवाडी), विशाल ज्ञानोबा जाधव (वय ३२ वर्षे, रा. बोराटे वस्ती, मोशी), विशाल चंद्रकांत भोसले (वय २४ वर्षे, रा. नाणेकरवाडी) यांच्या विरुध्द कारवाई केली.
याभागात केले गुन्हे
तिनही टोळ्यांनी स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने गुन्हे केले. बावधन, काळेवाडी, वाकड, सांगवी, हिंजवडी, महाळुंगे एमआयडी, चाकण, पौड,  राहुरी आणि बीड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्ह्यांची नोंद आहे. खुनाचा प्रयत्न, दरोडा,  खंडणी, तोडफोड करणे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अपहरण,  बेकायदेशिर अग्निशस्त्रे व हत्यार जवळ बाळगणे असे गुन्हे केले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे मोक्काची कारवाई केली.  

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"