फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
पिंपरी-चिंचवड

लघुउद्योजकांची कुदळवाडीतच जागा विकसित करून औद्योगिक पार्क बनवावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

लघुउद्योजकांची कुदळवाडीतच जागा विकसित करून औद्योगिक पार्क बनवावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी चिंचवड शहरातील लघुउद्योजकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या प्रतिनिधींसोबत देखील बैठक आज पिंपरी चिंचवड महापालिकेत पार पडली. बैठकीमध्ये कुदळवाडी, चिखली परिसरातील लघुउद्योजकांची आहे तीच जागा विकसित करून औद्योगिक पार्क बनवावे असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बैठकीमध्ये कुदळवाडी, चिखली परिसरातील लघुउद्योजकांची आहे तीच जागा विकसित करून औद्योगिक पार्क बनविणे, उद्योजकांना देण्यात आलेल्या सर्व एलबीटी नोटिसा रद्द करणे, टी २०१ पुनर्वसन प्रकल्प, सीईटी प्लांट व घातक कचरा विल्हेवाट लावणे, औद्योगिक परिसरात रस्ते व भुयारी गटार योजना राबवणे, सहा नवीन सबस्टेशन उभारणीसाठी एमआयडीसीमध्ये महावितरणला भूखंड उपलब्ध करून देणे, वाढत्या अनधिकृत झोपडपट्टी व वाढती अनधिकृत भंगार दुकाने बंद करणे, नाला अतिक्रमण हटवणे, सेवा शुल्कवाढ रद्द करणे, लघुउद्योजकांच्या संघटनेसाठी वृक्षलागवड व संवर्धनासाठी भोसरी, चिंचवड, पिंपरी येथे भूखंड उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीला राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, सहआयुक्त हिंमत खराडे, महावितरण मुख्य अभियंता सुनील काकडे, पुणे महापारेषण परिमंडल मुख्य अभियंता अनिल कोलप, एमआयडीसी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे, मुख्य अभियंता कैलास भांडेकर, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, अर्चना पठारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ पुणे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधव, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कुदळवाडीतील लघुउद्योगांना उध्वस्त करण्याचे काम महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये केले आहे.  लघुउद्योजक संघटनेने  लघुउद्योजकांचे कहदळवाडीतच पुनर्वसन व्हावे अशी मागणी लावून धरली होती.त्याचअनुसंघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गार्‍हाणे मांडले होते. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आणि पदाधिकार्‍यांनी गेली सहा महिने यासाठी प्रयत्न करत होते.

avratra 8
avratra 8
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"