फक्त मुद्द्याचं!

13th February 2026
पिंपरी-चिंचवड

दानवे आणि सावंत यांच्या हस्ते रविवारी “उद्धव श्री” पुरस्कार वितरण सोहळा!

दानवे आणि सावंत यांच्या हस्ते रविवारी “उद्धव श्री” पुरस्कार वितरण सोहळा!

पिंपरी : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या “उद्धव श्री २०२५” पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ आणि राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे धनादेश वाटप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मा.केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

viara vcc
viara vcc

यावर्षीचा “उद्धव श्री २०२५” पुरस्कार उद्योजक विश्व चोरडिया तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे राजेश म्हस्के यांना जाहीर झाला आहे अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष व संयोजक माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार आणि संयोजक सचिव माधव मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. रविवारी (दि.१७ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे हा समारंभ होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर, सह संपर्कप्रमुख पुणे जिल्हा आदित्य शिरोडकर, संपर्क प्रमुख भोसरी, पिंपरी विधानसभा केशरीनाथ पाटील, शिवसेना शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, शहर संघटिका रुपाली आल्हाट आणि ॲड. असीम सरोदे आदी उपस्थित राहणार आहेत.

“उद्धव श्री२०२५” पुरस्कारासाठी संजय आवटे (पत्रकारिता), विजय जगताप (सहारा वृद्धाश्रम), अनिल भांगडिया (उद्योजक), साजन बेंद्रे (कलाक्षेत्र), शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे (कामगार क्षेत्र), विशाल गायकवाड (कला क्षेत्र) देवा झिंजाड (लेखक), स्वातीताई गवारे (महिला उद्योजिका) अभिमन्यू सूर्यवंशी (क्रीडाक्षेत्र), रमेश वाघेरे पाटील (सामाजिक) यांचीही निवड करण्यात आली आहे अशी माहिती उद्धवश्री पुरस्कार समितीचे कार्याधक्ष युवराज कोकाटे, संघटक हाजी दस्तगीर मणियार, उपाध्यक्ष सुशीला पवार, संघटिका वैभवी घोडके, उपाध्यक्ष गोपाळ मोरे, सहसचिव नेताजी काशीद, खजिनदार हरेश नखाते, सह संघटक निखिल दळवी, सदस्य अभिजीत गोफण, प्रशांत तायडे, गुलाबचंद आसवानी, अशोक वाळके, कैलास नेवासकर, सावल तोतानी, संतोष म्हात्रे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"