फक्त मुद्द्याचं!

27th March 2026
पिंपरी-चिंचवड

प्रदेश ब्राह्मण महासंघावर पुष्कराज गोवर्धन, दिलीप कुलकर्णी!

प्रदेश ब्राह्मण महासंघावर पुष्कराज गोवर्धन, दिलीप कुलकर्णी!

पिंपरी : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची प्रदेश कार्यकारणी नुकतीस जाहीर करण्यात आली आहे .या कार्यकारिणीत पिंपरी चिंचवड मधील नऊ जणांचा समावेश करण्यात आला आहे .प्रदेश उपाध्यक्ष म्हणून उद्योजक पुष्कराज गोवर्धन यांची निवड करण्यात आली आहे .

viara vcc
viara vcc

याशिवाय प्रदेश सरचिटणीस पदी दिलीप कुलकर्णी. प्रवक्ता म्हणून अजित देशपांडे , प्रदेश युवा अध्यक्षपदी अश्विन इनामदार, प्रदेश मार्गदर्शक म्हणून आर एस कुमार तर सचिन कुलकर्णी यांची पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पवन वैद्य आणि अनुपमा कुलकर्णी यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ब्राह्मण महासंघाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे, शिष्यवृत्ती योजना चालवणे आणि गरजू कुटुंबांना आधार देणे असे उपक्रम आजपर्यंत राबवले असल्याचे पुष्कराज गोवर्धन यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"