विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तांकडून गौरव!

पिंपरी : राज्य पोलीस महासंचालकांनी पदक आणि विशेष सेवा पदक जाहीर केलेल्या, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी विशेष सत्कार केला.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या विश्वसनिय पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्कृष्ट सेवा कालावधीबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड ,पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण ,पोलिस अंमलदार विकास राठोड ,नितीन ढोरजे तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्याने पोलीस महासंचालक यांच्याकडून विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप खलाटे, पोलीस उपनिरीक्षक गंगाधर ढगे ,पोलीस उपनिरीक्षक अहमद मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक विकास सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव या सर्वांचाराज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे सन्मानचिन्ह बहाल करून सत्कार करण्यात आला.

या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त मुख्यालय विवेक पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक बापू बांगर, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल गोरे ,सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे ,सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे आदी यावेळी उपस्थित होते .