फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार करसंकलन कार्यालये!

सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार करसंकलन कार्यालये!

नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन विभागाचा निर्णय
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने कर वसुलीची कार्यवाही सुरु आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अर्थसंकप्लातील उद्दिष्टाप्रमाणे कर वसुली दि. ३१ मार्च २०२५ पुर्वी करणेची असून उपरोक्त उद्दिष्ट्यपुर्ततेकरीता केवळ १८ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. हीच बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुख्य कार्यालय तसेच १८ विभागीय कर संकलन कार्यालय यापुढे शनिवार व रविवार चालू ठेवणेचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवारी व रविवारी कर भरता येईल.

पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी १८ विभागीय कार्यालये कार्यान्वीत असून कराचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने कर भरण्याची सुविधा विभागीय कर संकलन कार्यलयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालेच्या विभागीय कर संकलन कार्यालयाचा तपशिल पुढीलप्रमाणे. आत्तापर्यंत ८३१ कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे, यासारख्या कठोर कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांना कर भऱण्याचे आवाहन करण्यासाठी करसंकलन विभागाकडून टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे. नागरिकांनी शनिवारी व रविवारी महानगरपालिकेकडून ८८८८००६६६६ सदर क्रमांकावरुन आलेले फोन अधिकृत असून त्याचबरोबर, @CP-PCMCPT @CP-PCMCWT या हॅंडलवरुन आलेले एस.एम.एस अधिकृत समजावेत. असे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नागरिकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. शनिवार आणि रविवार महापालिकेला सुट्टी असली तरी ३१ मार्चपर्यंत या दोन्ही दिवशी कर संकलन कार्यालये सुरुच ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्यासाठी वेळ वाढविण्यात आली आहे. दि. ३१ मार्चपर्यंत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात येणार आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"