फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

जगद्गुरु संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा ‘विश्वविक्रम’!

जगद्गुरु संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा ‘विश्वविक्रम’!

पिंपरी चिंचवड मधील दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने ही पगडी आज देहू देवस्थानला केली सुपूर्त.
देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त पाच फूट उंच आणि ३० फुटांचा घेर असलेली पगडी तुकोबाचरणी अर्पण करण्यात आली. ही जगातील सर्वांत मोठी पगडी असल्याचा दावा केला जात आहे. याची दखल वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया आणि जीनियस बुकने घेतली आहे. तुकोबाचरणी ही पगडी अर्पण करण्यात आली असून, देहू देवस्थानाकडूनही या भल्यामोठ्या पगडीचे कौतुक करण्यात आले. पिंपरी चिंचवड मधील दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने ही पगडी आज देहू देवस्थानला सुपूर्त केली.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजनिमित्त दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी तुकोबांच्या मंदिरात भलीमोठी पगडी भेट दिली आहे. ही पगडी पाहण्यासाठी तुकोबांच्या मुख्य मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. या पगडीचे आज अनावरण करण्यात आले. सुती कपड्यांपासून बनविण्यात आलेल्या तुकोबांच्या पगडीचा घेर हा तब्बल ३० फुटांचा असून, उंची पाच फुटांपर्यंत आहे. देहू संस्थानाकडून पगडीचे कौतुक करण्यात आले. संस्थानाच्या अध्यक्षांसह विश्वस्तदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. भाविकांच्या उपस्थितीत या पगडीच अनावरण झाले. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जयघोष करण्यात आला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"