फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

महाशिवरात्री निमित्त बर्फाच्या शिवलिंगासह अमरनाथ गुफा व सहस्त्रशिवलिंगाची स्थापना!

महाशिवरात्री निमित्त बर्फाच्या शिवलिंगासह अमरनाथ गुफा व सहस्त्रशिवलिंगाची स्थापना!

निगडी येथे प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय
पिंपरी : प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय निगडी शाखेतर्फे आज दि.२५ रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यामध्ये बर्फाच्या शिवलिंगासह अमरनाथ गुफा व सहस्त्रशिवलींग दर्शन तसेच आध्यात्मिक चित्रप्रदर्शनी आयोजित केली आहे.छत्रपती संभाजी चौक, ओमशांती बिल्डींग प्राधिकरण निगडी येथे आज प्रमुख पाहुणे निगडी पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकमान्य हाॅस्पीटलचे नवनाथ साखरे तसेच निगडी सेवाकेंद्राच्या ब्रह्मकुमारी योगिता दिदी उपस्थित होत्या.

आज शेकडो नागरीकांनी देखाव्याचे दर्शन घेतले. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ८.०० ते रात्री ९.०० पर्यंत देखावा सर्वांना पाहण्यास खुला राहणार असून सर्व नागरिकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रम्हकुमारीज या संस्थेने केले आहे.
मेडीटेशनद्वारे जीवनामध्ये तणावमुक्ती, व्यसनमुक्ती, सकारात्मक जीवन शैली इत्यादी विषयावर ब्रह्मकुमारीज विद्यालयामध्ये प्रशिक्षण दिले जाते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"