फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

इंद्रायणी थडी होणारच.. पण, प्रतीक्षा ?

इंद्रायणी थडी होणारच.. पण, प्रतीक्षा ?

इंद्रायणी थडी आणखी काही दिवस लांबणीवर
पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंचच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा आणि महाराष्ट्रभरातील महिला भगिनींसाठी आकर्षणाचाच केंद्रबिंदू असणारा इंद्रायणी थडी महोत्सव या वर्षीही २७ फेब्रुवारी ते २ मार्च या चार दिवसांदरम्यान आयोजित करण्यात आला होता. पण, काही कारणांमुळे इंद्रायणी थडी इंद्रायणी थडी महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत आयोजकांकडून अधिकृत पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

आयोजक आमदार महेश लांडगे व शिवांजली सखी मंच च्या वतीने प्रसिद्ध कारण्यात आलेल्या पत्रकाद्वारे सांगितले आहे की, इंद्रायणी थडीची तयारी शिवांजली संखी मंच आणि सर्वच सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सुरू केली होती. स्टॉल वाटप, विविध कार्यक्रमाची रुपरेषा अगदी अंतिम टप्प्यात होती. पण, सध्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. ज्या ठिकाणी इंद्रायणी थडी भरवण्यात येत आहे. या परिसरात 20 ते 25 मोठ्या शाळा आहेत. या ठिकाणी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थांना व पालकांची गैरसोय होणार आहे. वाहतूक नियोजन आणि नियंत्रण हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. याबाबत शिक्षण संस्था प्रशासनाकडून तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने ‘कॉपीमुक्त महाराष्ट्र’ अभियान सुरू केले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाला अडचण होणार नाही, याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.

तसेच, मोशी आणि चऱ्होली गावातील ग्रामदैवतांचा उत्सव होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांनी एकाच आठवड्यात तीन जत्रा होतील. त्यामुळे स्थानिक नागरिकांना सहभागी होता येणार नाही, असाही एक विचार पुढे आला. दरम्यान, श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आणि प्रखर हिंदूत्ववादी कीर्तनकार ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे अध्यात्मिक आणि वारकरी सांप्रदायातून शोक व्यक्त होत आहे. अशावेळी या महोत्सवाचे आयोजन योग्य ठरणार नाही त्यामुळे इंद्रायणी थडी महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे असे महोत्सवाच्या समन्वयक मुक्ता गोसावी यांनी
पत्रकाद्वारे कळविले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"