फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

कराड याची पिंपरीतील मालमत्ता होणार सील

कराड याची पिंपरीतील मालमत्ता होणार सील

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड याचा पिंपरी-चिंचवडमधील वाकडमध्ये चार बीएचके फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. या फ्लॅटची मिळकतकराची सुमारे दीड लाख रुपयांची थकबाकी असल्यामुळे तो सिल करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने दिला आहे.

वाकडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ६०१ क्रमांकाचा फ्लॅट वाल्मिक बाबुराव कराड याच्या पत्नीच्या नावावर असल्याचे निदर्शनास आले आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांच्या आसपास आहे. १६ जून २०२१ रोजी फ्लॅटची नोंदणी झाली आहे. त्यानंतर एक लाख ५५ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने २१ नोव्हेंबर २०२४ रोजी नोटीस बजावली आहे. त्यानंतरही कराचा भरणा झालेला नाही.

नोटीशीनंतरही कराचा भरणा केला नसल्यामुळे प्रशासनाकडे फ्लॅट सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतरही थकबाकी न भरल्यास लिलावाची प्रक्रिया केली जाईल, असा इशारा कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिला.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"