फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पीएमआरडीएकडून १५ एकर जागा पिंपरी चिंचवड पोलिसांना हस्तांतरित!

पीएमआरडीएकडून १५ एकर जागा पिंपरी चिंचवड पोलिसांना हस्तांतरित!

पिंपरी : वाकड मधील पेठ क्रमांक ३१ येथील १५ जागा पीएमआरडीएकडून पिंपरी- चिंचवड पोलिसांना मिळाली. शुक्रवारी (दि.२७) या जागेचा आगाऊ ताबा पोलिसांना मिळाला आहे. एक वर्ष आठ महिने एवढ्या कमी कालावधीत जागेबाबत पाठपुरावा करून जागा मिळवण्यात आयुक्त विनयकुमार चौबे यांना यश आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना ६ वर्षापूर्वी झाली, तरी देखील पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालय, पोलीस अधिकारी यांची निवासस्थाने, पोलीस विभागाचे मुख्यालय व इतर अनुषंगीक कार्यालये यांना स्वतंत्र जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे चालविण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत होत्या. पीएमआरडीएच्या ताब्यात असणाऱ्या वाकड येधील पेठ क्रमांक ३९ येथे मोकळी जागा असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यातील १५ एकर जागा मिळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पीएमआरडीएकडे प्रस्ताव पाठवला. पीएमआरडीएने हा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठवला होता.
अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा
या जागेसाठी २४९.१२ कोटी रुपये शासनाकडून प्राप्त करण्यासाठी पुन्हा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे वैयक्तिकरित्या पाठपुरावा करण्यात आला. ही रक्कम पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आली. त्यामुळे या जागेचा अतिशय कमी कालवधीमध्ये म्हणजेच केवळ एक वर्ष आठ महिन्यांमध्येच पीएमआरडीएकडून पिंपरी चिंचवड पोलीस पोलीस आयुक्तालयास आगाऊ ताबा मिळाला आहे.
१५ एकर मध्ये काय साकारणार?
१५ एकर जागेमध्ये पोलीस उप आयुक्त (परिमंडळ दोन) कार्यालय, गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक फायर्यालय, खंडणी विरोधी पथक कार्यालय, वाहतुक विभाग तसेच इतर अनुषंगीक कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्याशिवाय या जागेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मल्टिपर्पज हॉल, कैफेटेरिया, जॉगिंग ट्रैक, मुलांसाठी खेळाचे मैदान इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त ते सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांची निवासस्थाने उभारली जाणार आहेत.
मुख्यालयासाठी जागेची प्रतीक्षा
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकरिता चिखली येथील नऊ एकर जागेचा ताबा यापूर्वीच मिळाला आहे. तर ताथवडे येथे पोलीस मुख्यालय उभारण्यात येणार असून त्यासाठी ५० एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. ही मागणीही लवकरच मान्य होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्यक्त केला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"