पिंपरी रेल्वे स्टेशनवर अडवून तरुणाला लुटले!

पिंपरी : पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरातून जात असताना एका तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल व रोकड लुटण्यात आली. ही घटना मंगळवार 9 जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तोहीत मुन्ना शेख (वय 22, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .यश चंद कांबळे (वय 20, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. सुदर्शन थोरात व शिव पवार (दोघेही राहणार भारत नगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरातून जात असताना आरोपींनी त्यांना काम आहे असे सांगून थांबवले .त्यानंतर फिर्यादीकडे पैशाची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच त्याच्याकडील पंधरा हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन आणि 700 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

