Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

25th October 2026
गुन्हेगारी

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार; पाच गुन्हेगारांना अटक!

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार; पाच गुन्हेगारांना अटक!

पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून सराईत गुन्हेगाराने पाच साथीदारांच्या मदतीने तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रालाही सिमेंटच्या गट्टूने मारहाण करण्यात आली. नेहरूनगर येथील जैन चौकात गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी विशाल शिवाजी लष्करे (वय 23, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भुऱ्या उर्फ रोहित सिद्धार्थ कांबळे (रा. 31, पत्रा शेड , विठ्ठलनगर, पिंपरी), ओंकार उर्फ चिक्या दत्ता उकिरडे (वय 18, रा. एल 129, पत्रा शेड, एचए ग्राउंड संतोषी माता चौक, नेहरूनगर), चिराग प्रवीण गोरखा (वय18, रा. डी 63, पत्रा शेड, एचए ग्राउंड, नेहरूनगर, पिंपरी), गणेश राजू हरळ (वय 21, रा. बी नंबर नऊ, रूम नंबर 208, समता हौसिंग सोसायटी, विठ्ठलनगर ,पिंपरी), अनिकेत अमोल यादव (वय 20, रा. 29 ,पत्रा शेड, एचए ग्राउंड, नेहरूनगर पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात फिर्यादी विशाल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाल हा त्यांचा मित्र कौस्तुभ देशमुख यांच्यासोबत नेहरूनगर येथे पान खाण्यासाठी गेला होता. विशाल आणि आरोपी भुऱ्या यांची पूर्वीपासून तोंड ओळख आहे. त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाले होती. याच भांडणाचा राग मनात धरून विशाल पान टपरी जवळ उभे असताना भुऱ्या येथे आला. त्याने विशाल यांना टपरीच्या बाजूला नेऊन त्याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या आल्यामुळे विशाल आणि कौस्तुभ यांनी प्रतिकार करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांना अडवले. यावेळी कौस्तुभ देशमुख यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी विशाल याला पकडून पुन्हा कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"