Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
गुन्हेगारी

दहा हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना साप्ताहिकाच्या पत्रकारास अटक!

दहा हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना साप्ताहिकाच्या पत्रकारास अटक!

पिंपरी : स्पा सेंटर चालकाकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागून दहा हजार रुपये खंडणीची रक्कम स्वीकारताना साप्ताहिक वंचित सामनाचे पत्रकारास सापळा रचून खंडणी विरुद्ध पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवार 9 ऑक्टोबर रोजी साई कॉर्नर, जगताप डेअरी चौक, रहाटणी येथे करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली.

viara vcc
viara vcc

याबाबत गुन्हे शाखेमध्ये स्पा सेंटरचे चालक साजिद मन्सूर पेंढारी (वय 27, रा. साखरे वस्ती, पांडुरंग बिल्डिंग, हिंजवडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. साप्ताहिक वंचित सामनाचे पत्रकार अरुण अक्षय अरुण वाघमारे (वय 35, 38 औंध रोड, भाऊ पाटील पाडळे वस्ती, खडकी) यांच्याविरुद्ध काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून जप्त केलेला 2 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काळेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय वाघमारे यांनी अर्थ स्पा सेंटर रहाटणी बाबत डायल 112 ला कॉल करून पोलिसांना खोटी माहिती देऊन मानसिक त्रास दिला. तसेच स्पा सेंटर चालवायचे असेल तर 50 हजार रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. ती दिली नाही तर स्पा सेंटर बाबत वर्तमानपत्रात बातम्या छापून व्यवसाय बंद करीन. जास्त नाटक केल्यास खल्लास करून टाकण्याची धमकी दिली. सदर तक्रारीची खातरजमा केली असता पत्रकार वाघमारे यांनी फिर्यादी साजिद मन्सूर पेंढारी यांना वारंवार फोन करून तसेच समक्ष भेटून खंडणीची मागणी करत असल्याचे उघड झाले. त्यावरून खंडणी विरोधी पथकाने पडताळणी करून सापळा रचला. शुक्रवार 9 ऑक्टोबर रोजी पत्रकार वाघमारे यास दोन पंचासमक्ष दहा हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना साई कॉर्नर, जगताप डेअरी चौक, रहाटणी येथे ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे (दोन) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अंमलदार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडांबे, रमेश मावसकर ,किशोर कांबळे, दादाभाऊ साबळे यांचे पथकाने केली. स्पा सेंटर चालकाकडून

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"