फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

महिलांचा निर्धार, राहुलदादाच आमदार !

महिलांचा निर्धार, राहुलदादाच आमदार !

विकासाची चाहूल, निवडा फक्त राहुल, सुळेंचे आवाहन
चिंचवड : चिंचवड मतदारसंघात महिला मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यंदा महिला मतदार चिंचवडचा आमदार ठरविण्यात निर्नायकी भूमिका बजावतील आणि महिला मतदार विकासाची भूमिका मांडणाऱ्या राहुल कलाटे यांना साथ देतील अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केल्या.

सुळे यांनी सोमवारी (ता. ११) चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या कार्यालयाला भेट देऊन सोसायटी धारकांसोबत संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या. चिंचवड मतदारसंघात शहरीकरण वाढते आहे. पण, त्याप्रमाणे महिला आरोग्य आणि सुरक्षितता यांच्यासाठी कोणतेही ठोस काम सत्ताधाऱ्यांनी केलेले नाही. हेच आम्ही मतदारसंघातील महिला मतदारांना समजावून सांगत आहोत आणि त्याला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळतो आहे अशी भावना महिला पदाधिकाऱ्यांनी सुळे यांच्याकडे मांडली. सोसायटीधारकांनी आपल्या पाणी, वीज, रस्ते अशा समस्या सुळे यांच्यासमोर मांडल्या. त्यांच्या सर्व प्रश्नांना सुळे यांनी ऐकून घेतले आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सुळे यांनी देत आता विकासाची चाहूल निवडा फक्त राहुल असे आवाहन नागरिकांना केले.

हे ही वाचा : महिलांचा निर्धार, राहुलदादाच आमदार ! womens-determination-rahul-dada-is-the-mla

परिवर्तन घडवणार !
चिंचवडमध्ये गेली १२ वर्षे आम्ही रहात आहोत. शहर वाढले पण त्याप्रमाणात सुविधा आलेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी आमचे आरोग्य, सुरक्षितता, स्वावलंबन याला महत्व देणाऱ्या राहुल दादांना साथ देऊन परिवर्तन घडवणार असा निर्धार महिलांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात केलेला आहे.

  • ज्योती निंबाळकर ,महिला शहर अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"