फक्त मुद्द्याचं!

1st June 2026
पिंपरी-चिंचवड

“ज्येष्ठानुबंध ॲप”मुळे पोलिसांची नवी ओळख!

“ज्येष्ठानुबंध ॲप”मुळे पोलिसांची नवी ओळख!

ज्येष्ठ नागरिकांसोबत आपुलकी वाढवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी कायद्याच्या रक्षणासोबतच माणुसकीची जपणूक करण्यासाठी जेष्ठ नागरिकांसोबत वेळ देण्यासाठी ज्येष्ठानुबंध ॲपच्या माध्यमातून शहरात नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कायद्याच्या संरक्षणासोबतच नागरिकांना सहकार्य करून त्यांच्यात पोलिसांबाबत विश्वास निर्माण करावा ही भावना लक्षात ठेवून पोलिसांचा बंदोबस्त, तपास, गुन्ह्यांच्या बैठका, गस्ती मधून पोलिसांनी वेळ काढत शहरातील ज्येष्ठांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे .

vcc gudhi padva
vcc gudhi padva

शहरातील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस सेवा व इतर आवश्यक सेवा सहज विश्वासाने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी जेष्ठानुबंध ॲप विकसित केले आहे .या अभिनय उपक्रमामुळे ज्येष्ठांना एक हक्काचा आधार मिळाला आहे. या अंतर्गत सुमारे 28 हजार जेष्ठांनसोबत कायम आपुलकी जपली आहे. चेष्टानुबंध वरून ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस खात्यासंबंधी तसेच त्यांच्या वैयक्तिक अडचणी देखील सोडवल्या जात आहेत. पोलिसांकडून सहज तात्काळ मदत मिळविली जाते. ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन स्तरावर पोलिसांनी नियमित भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याबाबत उपक्रम सुरू केला असून ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्यात येणार आहेत.

त्यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार हे त्यांचे हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस असेल त्यांच्या घरी अथवा वृद्धाश्रमात भेट देतील. त्यांच्यासोबत केक कापून व पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करून आनंद द्विगुणीत करतात. या उपक्रमाची सुरुवात म्हणून सुशीला कपालदास गुलानी, पद्म किशोर सरपोतदार, नयन रमाकांत पानसरे यांची समक्ष भेट घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे वाढदिवस साजरे केले आहेत.

या उपक्रमाबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून सदर उपक्रम दैनंदिन स्तरावर आयुक्तालयाच्या हद्दीत साजरा केला जाणार आहे. या उपक्रमामुळे पोलिसांचा थेट नागरिकांशी संबंध द्विगणित होणार आहे. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेष्ठ नागरिकांनी ज्येष्ठानुबंध ॲप डाऊनलोड करून त्यांचा सहभाग नोंदवावा असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.


Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"