मूल होत नसल्याच्या कारणावरून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार!

पिंपरी : मूल होत नसल्याच्या कारणावरून पत्नीशी वाद घालून तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने भाजी कापण्याच्या चाकूने तिचे गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सर्वे नंबर सहा/ एक, मोहटादेवी मंदिर समोर ,कैलास नगर, थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी अमोल लहू कांबळे पोलीस उपनिरीक्षक काळेवाडी पोलीस ठाणे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितेश नंदनकिशोर गायकवाड (वय 35, रा. सर्वे नंबर सहा / एक ,मोहटादेवी मंदिर समोर, कैलास नगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी त्यांची पत्नी (वय 25) ही मुल होत नसल्याच्या कारणावरून तिच्याशी वाद घालून तिला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने भाजी कापण्याच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाईक निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे हे तपास करत आहेत.

‘पेन्शन कार्ड’ काढून देण्याच्या बहाण्याने जेष्ठ नागरिकाची फसवणूक!
पिंपरी : ‘पेन्शन कार्ड’ काढून देतो असे सांगून ओटीपी देण्यास भाग पाडून अप्रमाणिकपणे ज्येष्ठ नागरिकाच्या व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून 3 लाख 30 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. ही घटना 21 जुलै ते 25 जुलै 2026 दरम्यान फिर्यादी यांचे राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडली.
या प्रकरणी महादेव काळाराम रोकडे (वय 61, रा. फ्लॅट नंबर 101, विजयराज हेरिटेज, विजयराज कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. लाभार्थी बँक अकाउंट धारक (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादीस ‘पेन्शन कार्ड’ काढून देतो असे सांगून त्यांना ओटीपी देण्यास भाग पाडले. स्वतःच्या आर्थिक फायदा करिता फिर्यादी व फिर्यादी यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून आयएमपीएस द्वारे 3 लाख 30 हजार रुपये काढून घेऊन फिर्यादी यांची ऑनलाईनपध्दतीने आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जावळे व पोलीस निरीक्षक गुन्हे नांदेकर हे तपास करत आहेत.

