फक्त मुद्द्याचं!

1st May 2026
गुन्हेगारी

तडीपार आदेशाचा भंग ;आरोपीस अटक

तडीपार आदेशाचा भंग ;आरोपीस अटक

पिंपरी : पुणे जिल्हा व खालापूर तालुक्यातून तडीपार असलेल्या गुन्हेगाराने आदेशाचा भंग केला. याशिवाय शस्त्रसंधी प्रतिबंध असताना जवळ लोखंडी कट्टा पिस्तूल बाळगल्याने अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवार 30 एप्रिल रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास वराळे, आंबी रोड ते आशियाना सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली.

vcc maharastra din
vcc maharastra din

रमेश सोमीनाथ घुले पोलीस शिपाई, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अनिल जगन जाधव (वय 26, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यास पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांनी दोन वर्षासाठी संपूर्ण पुणे जिल्हा व खालापूर तालुक्यामधून तडीपार केले आहे. तरीदेखील आरोपी अंबी गावचे हद्दीत वराळे, आंबी रोड आशियाना सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत मिळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पंचवीस हजार रुपये किंमतीचा एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा व एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतुस जवळ बाळगल्याचे मिळून आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घातक शास्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना आरोपीने या आदेशाचे देखील उल्लंघन केले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"