फक्त मुद्द्याचं!

1st May 2026
गुन्हेगारी

प्रतिबंधित सुगंधी पान मसाला विक्री व साठवणूक; तिघे अटकेत!

प्रतिबंधित सुगंधी पान मसाला विक्री व साठवणूक; तिघे अटकेत!

अन्नसुरक्षा अधिकारी पथकाची तीन ठिकाणी छापा टाकून कारवाई
पिंपरी: प्रतिबंधित सुगंधी पान मसाला विक्री व साठवणूक केल्याने अन्नसुरक्षा अधिकारी पथकाने तीन ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. बुधवार 29 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदामा पान शॉप धर्मवीर चौक चर्होली फाटा चर्होली बुद्रुक राहुल पान शॉप अनोळ अनमोल बेकरी जवळ द्वारका सोसायटी समोर चर्होली फाटा ,सावकार पान शॉप अनमोल बेकरी समोर द्वारका सोसायटी समोर चर्होली फाटा येथे करण्यात आली.

vcc maharastra din
vcc maharastra din

याप्रकरणी अक्षय मधुकर शेळके, समृद्धी नितीन चव्हाण ,प्रशांत शिवराज लोहार (अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन पिंपरी चिंचवड प्राधिकरण) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दत्तात्रेय बन्सी काळे (वय 55 ,रा. रूम नंबर दोन,चर्होली फाटा, सुरज संजय गव्हाणे (वय 26, रा. मराठी शाळेसमोर चोवीसावाडी, चर्होली, क्षितिज शिवाजी गावडे (वय 25, रा. आळंदी मरकळ रोड, धानोरी फाटा, धानोरी चर्होली बुद्रुक, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली होती की चरवली फाटा धर्मवीर चौक येथे सुदामा पान शॉप,राहूल पान शॉप,सावकार पान शॉप मध्ये राजनिवास सुगंधित पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, आर एम डी पान मसाला, विमल पान मसाला, शॉर्ट 999 लक्झरी ची विंग टोबॅको बी एक, गोल्ड जाफरानी जर्दा असे प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री करत असून त्यांच्याकडे साठा देखील मिळून आला आहे. पंचा समक्ष हा साठा जप्त करण्यात आला आहे. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव हे पुढील तपास करत आहेत .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"